इतिहास तुमची नक्की नोंद घेईल
इतिहास तुमची नक्की नोंद घेईल. एक वाचनात आलेली गोष्ट तुम्हाला सांगु इच्छितो,जी आताच्या काळात चपखलपणे लागू होते. एका गाव आणि जंगलाच्या सीमेवरील घरातील म्हातारी रोज अंगणात पक्षांना धान्य टाकायची.त्या जंगलातील एक चिमणी रोज त्या अंगणात येऊन दाणे टिपून आपल्या घरट्यात यायची,आपल्या पिलांना भरवायची आणि स्वतःही खायची. तिचा दररोजचा दिनक्रम होता. एकदा त्या घराला काही कारणांनी आग लागते.ती बातमी त्या चिमणीला समजते,ती घराजवळ जाऊन पहाते,तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. ती तडक जंगलातील पाणवठ्यावर जाऊन आपल्या चोचीत पाणी भरून आणते.आपल्या इवल्याशा चोचीतील पाणी ती आगीवर टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू करते. ती पाणवठ्यावर जायची चोचीत पाणी घ्यायची आणि आगीवर आणून टाकायची. जंगलातील एक माकड हे तिचे आगीवर पाणी टाकून आग विझवण्यासाठीचे प्रयत्न बऱ्याच वेळापासून पाहत असतो. तो चिमणीला म्हणतो,"मी बऱ्याच वेळापासून पाहतो आहे,तु ती आग विझविण्यासाठी प्रयत्न करत आहेस. अगं किती मूर्ख आहे तू ,तुला कळत कसं नाही,तुझा जीव केवढा, ती आग केवढी,तुझ्या ...