Posts

Showing posts from September, 2025

आसपासच्या मंथरा....

Image
आसपासच्या मंथरा... मंथरा ही रामायणातील केवळ एक व्यक्तिरेखा नाही. ती एक प्रवृत्ती आहे. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात मंथरा वावरत असतात. आपल्या हिताचा आव आणून त्या अशा काही आपल्या कानात आणि मग मनात शिरतात, की असं वाटतं यांच्याशिवाय आपला तरणोपाय नाही. अन् मग हलके हलके सारं अस्तित्वच त्या ताब्यात घेतात. आपल्या निर्णयाच्या त्या सूत्रधार होतात. हळूहळू घराला पडणारे तडे, जवळच्या नातलगांची होणारी भांडणं हाच या मंथरांचा चारा असतो. तो खाऊन त्या तृप्त होतात, मस्त होतात. मंथरा कोण, हे वेळीच कळून, त्यांना कानात शिरणारी वळवळणारी गोम जशी चपलेनं ठेचतात, तसं वेळीच ठेचून टाकता यायला हवं. आपल्या आसपास या मंथरांची छाया पडणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. आपल्या घरातले सर्व कुटुंब - घटक हे कितीही मतभेद असले, तरी इतरांनी काडी टाकल्यावरही अभेद्य असले तर आपल्या एकतेच्या भिंतीवर नांगी आपटून निष्प्रभ होतात. मंथरा सर्वत्र असतात. क्वचित ती आपल्यातूनही जागी होते._ इतरांचे आनंद सोहळे नष्ट करते. रामायण घडतं ते मंथरेमुळेच ! ते पुरणातालं काय न् या क्षणीचं काय, वनवास प्रत्येकाच्या नशिबी येतो. कधी वनातला, क...