इतिहास तुमची नक्की नोंद घेईल

इतिहास तुमची नक्की नोंद घेईल.

          एक वाचनात आलेली गोष्ट तुम्हाला सांगु इच्छितो,जी आताच्या काळात चपखलपणे लागू होते. एका गाव आणि जंगलाच्या सीमेवरील घरातील म्हातारी रोज अंगणात पक्षांना धान्य टाकायची.त्या जंगलातील एक चिमणी रोज त्या अंगणात येऊन दाणे टिपून आपल्या घरट्यात यायची,आपल्या पिलांना भरवायची आणि स्वतःही खायची. तिचा दररोजचा दिनक्रम होता.

            एकदा त्या घराला काही कारणांनी आग लागते.ती बातमी त्या चिमणीला समजते,ती घराजवळ जाऊन पहाते,तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. ती तडक जंगलातील पाणवठ्यावर जाऊन आपल्या चोचीत पाणी भरून आणते.आपल्या इवल्याशा चोचीतील पाणी ती आगीवर टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू करते. ती  पाणवठ्यावर जायची चोचीत पाणी घ्यायची आणि आगीवर आणून टाकायची. जंगलातील एक माकड हे तिचे आगीवर पाणी टाकून आग विझवण्यासाठीचे प्रयत्न बऱ्याच वेळापासून पाहत असतो. तो चिमणीला म्हणतो,"मी बऱ्याच वेळापासून पाहतो आहे,तु ती आग विझविण्यासाठी प्रयत्न करत आहेस. अगं किती मूर्ख आहे तू ,तुला कळत कसं नाही,तुझा जीव केवढा, ती आग केवढी,तुझ्या चोचीत पाणी मावणार ते किती?ते पाणी तु त्या आगीवर टाकून खाली पडायच्या आत त्याची वाफ होत आहे.अशी तुझ्या पाणी टाकण्याने ती आग विझणार आहे का?खरंच तू वेडी आहे." यावर ती चिमणी त्या माकडाकडे स्मितहास्य करून म्हणाली,"दादा तुझं बरोबर आहे,माझा जीव केवढा, ती आग केवढी,माझ्या चोचीत पाणी मावणार ते किती?ते पाणी त्या आगीवर खाली पडायच्या आत त्याची वाफ होत आहे.अशी माझ्या पाणी टाकण्याने ती आग विझणार आहे का? तर नाही,नक्कीच नाही विझणार ही आग.पण लक्षात ठेव ज्या दिवशी या आगीच्या घटनेचा इतिहास लिहिला जाईल, त्या इतिहासात माझं नाव आग विझवण्याचा प्रयत्न करणारी एक छोटी चिमणी म्हणून घेतलं जाईल. आग लावणारी किंवा लागलेली आग निष्क्रियपणे पाहत बसणारी किंवा जळालेल्या घरातील लोकांना  लुटणारी व्यक्ती म्हणुन  नसेल." 

          ही चिमणीची गोष्ट अनेकांना माहीतही असेल,पण ही गोष्ट या कोरोनाच्या महामारीत प्रकर्षाने आठवली.या महामारीत आरोग्यव्यवस्थेतील अनेक डॉक्टर,नर्सेस,औषध विक्रेतेरुग्णवाहिका चालक,स्वछता कर्मचारी,रुग्णालय प्रशासन अधिकारी, शासकीय यंत्रणांतील अधिकारी कर्मचारी,पोलीस अधिकारी कर्मचारी,वेगवेगळ्या सामाजिक संस्था संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते  असे एक ना अनेक जण आपापल्या परीने या 'आगीवर पाणी टाकून ती विझवण्याचा जिवाच्या आकांताने प्रयत्न' करत आहेत. ही माणसं काय त्यांची इतिहासाने नोंद घ्यावी म्हणुन नाही धावपळ करत आहेत,त्यांना या महासंकटातून जगाला वाचवायचयं. त्यामुळं मानवतेचा  इतिहास तुम्हाला कधीच विसरणार नाही.हे काम करत असताना ज्यांना आपले प्राण गमवावे लागले,त्यांचं बलिदानही मानवता विसरणार नाही,जगाच्या अंतापर्यंत तुमचं काम लक्षात ठेवलं जाईल, 'तुम्ही मानवी जीवन जिवंत ठेवण्यासाठी जिवाच्या आकांताने काम केलं.'

        ही मंडळी जीव तोडून काम करत असताना काही ***** लोकं या महामारीतही धंदा करु पाहताहेत. रुग्णांचे नातेवाईक त्या दोन इंजेक्शनसाठी धावपळ करताना, ते इंजेक्शन लोकांना पुरवताना प्रशासनाची दमछाक होत असताना,ही नीच धंदेवाईक लोकं अव्वाच्या सव्वा दरात,ही इंजेक्शने विकताहेत.त्याच्या काय काय किंमती आहेत त्याच्या क्रूर दंतकथा गायल्या जातील.लाज कशी वाटत नाही हो तुम्हाला,कुणाचा तरी रक्ताचा मृत्यशी लढतोय आणि तुम्ही त्याच्या जगण्याची किंमत वसूल करता.धंदा करने का भी एक टाइम होता है,आपने तो धंदे के सब उसुल ही तोड दिये... इतिहास तुम्हाला लक्षात ठेवेल, विसरु नका...

        काही नालायक रुग्णवाहिका चालक काही किलोमीटरच्या प्रवासासाठी हजारो रुपये वसूल करत आहेत.अरे बाबांनो कळत कस नाही तुम्हाला काळ आणि वेळ सांगून येत नाही.रुग्णालयातून रुग्णाच्या खिशातून पैसे काढून घेत असतानाच व्हिडीओ पाहिला, काय बोलावं-लिहावं कळेना...सगळ्यात वाईट तर तेव्हा वाटलं जेव्हा काही रुग्ण मृत्यू पावल्यानंतर त्यांना कोरोना होता म्हणून त्यांचं कोणी रक्ताचं अंत्यसंस्कार करायला आलं नाही...इतकी कशी आटली ही नाही...अरे बस रे बाबांनो....सुधारून घ्या...तुमची आज कदाचित वेळ चांगली असेल पण काळ कधी माफ करत नाही...समय बडा बलवान होता है...

        मघाशी सांगितलेल्या गोष्टीत ती चिमणी म्हणाली तसं, या महामारीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी तुमचं नाव इतिहासाने काय म्हणून लक्षात ठेवावं याच प्रत्येकाने आत्मचिंतन करावं....


Comments

Vaibhav Raktate said…
खुपच मार्मिक आणि वस्तुस्थिती, कमीत कमी वाचुन काही % प्रमाणात जरी आचरण करता आले तरी तुमचे एवढया तळमळीचे आणी कष्टपूर्वक लिखाण सार्थक होईल
Unknown said…
साहेब खूप छान वाक्यरचना केली आहे आणि खरच सध्या परिस्थिती अशीच आहे करोना रुग्णासाठी प्रामाणिक पणे जीवच रान करणारे पण आहेत आणि दुसरीकडे काही समाज कंटक फायदा पण घेत आहेत
आणि सर्वात मोठी म्हणजे गलिच्छ राजकारण एकत्र येऊन काम करण्या पेक्षा दमोठे पणा घ्यान्या साठी केविलवणी प्रयत्न
Amol said…
अगदी मार्मिक आणि परिस्थितीला तंतोतंत गोष्ट आहे सर सध्या करोणा हा काही व्यवसायीकान साठी धंदाच नाही तर जणू काही खोऱ्याने पैसे ओढण्यासाठी च मशीन बनल्या सारखे लोकं आपली खिसे भरून घेत आहेत,
परंतु तुम्ही म्हंटला तसं वक्त बडा बलवान होता है. ज्या गतीने भिंतीवर बॉल टाकलाय त्या गतीने त्यांच्याकडे तो नक्की येणार आणि त्यावेळेस त्यांना या सगळ्या गोष्टींची आठवण होईल परंतु तेव्हा वेळ निघून गेलेली असेल.....
सर, आपले मनोगत एकदम योग्य आहे. अशा संकटकाळी चिमण्यांची संख्या वाढली पाहिजे. वर्षानुवर्षे त्याच चिमण्या जर पाणी टाकत राहिल्या बाकिच्या चिमण्या आपला राजकिय,सामाजिक स्वार्थ साधत राहिल्या तर चालणार नाही. फक्त संकटसमयीच नव्हे तर कायमस्वरूपी समाज म्हणून चिमण्यांनी काम करत राहिले पाहिजे. संकटे येतील जातील पण 'पाणी टाकण्याचा संस्कार' कायम रहावा म्हणून कायम कार्यरत असावे.एवढेच.
काही चिमण्या सतत काम करत असतात. कोणतीही प्रसिध्दी न करता, कोणतेही सरकारी अनुदान न घेता कारण त्यांना 'पाणी टाकण्याचा संस्कार' कायम टिकवायचा असतो.
पण काही चिमण्या एनजीओ टाईप काम करतात, थातुरमातुर काम करायचे. ज्या कामाने समाजातील संकटांवर काहीच उपाय होणार नसतो पण ते आपल्या कामाचा छानसा प्रोजेक्ट करतात. बातम्या करतात आणि सरकारी अनुदान लाटतात.
आपण आज लिहलेल्या मनोगतातून सर्वच चिमण्यांनी संकटातच नव्हे कायमस्वरूपी काम करत राहिल्याचा संस्कार घ्यावा, हि विनंती.
◾(चिमणी = समाजात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते)
Unknown said…
खरतर आपल्या पिढीला या महामारीने एका फार मोठ्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे जे सर्व मनुष्य जातीला शोधण्यासाठी आयुष्य खर्ची घालूनही मिळत नाही. Purpose of Life.अनेक बाबा बुआ यांना पैसे देऊनही ज्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही ते या अनुभवातून मिळत गेले. हिच संधी मानून मनुष्याने मानव जातीच्या आणि निसर्गाच्या ऋणातून मुक्त होण्याचा छोटासा का होईना, प्रयत्न करावा.
Unknown said…
खरंचवस्तु स्थिती सत्य आहे खरच इतिहास लिहिला जाईल तेव्हा आपली पुढची पीडी आपली काय बोलायच बोलले पापी की दानवीर
Unknown said…
खूप छान सर खरंच ही आजची वस्तुस्थिती आहे
प्रत्येक जण यातून गेलाय आणि जातोय, त्यामुळे आपण जे आपले मनोगत मान्डलाय् ना ते वाचना-याला स्वतःचे वाटत असणार हे नक्की, सध्याच्या परिस्थितीला योग्य आणि समर्पक लिखान् केलेय सर
Unknown said…
अगदी मार्मिक शब्दात आपण वस्तुस्थिती मांडली आहे.
A said…
खरंच अगदी थोड्या शब्दात सत्य परिस्थिती मांडली आहे.
Unknown said…
अबीजीत सर तुम्हीं अगदी समजेन अशा शब्दातून आपले विचार मांडले,करोना विषाणू रोखण्यासाठी काम करत असणारी लोकान प्रयत्न हा mcg जर पोहोचला माझ्या सारख्या कार्यकर्ती कडून तर नक्कीच समाज प्रभोधन होणार मी हा mcg भरपूर लोकांनपर्यंत पोहोचवणार साहेब धन्यवाद
या परिस्थितीतले हे खुपच भयाण व मन हेलावून टाकणारी आहे. समाजातील काही लोक इतके कृर कसे वागू शकतात याचेच आश्चर्य वाटते.

मित्रा खुप छान शब्दात या परिस्थितीची मान्डणी केलीये.

खुप शुभेछा..💐
या परिस्थितीतली ही खुपच भयाण व मन हेलावून टाकणारी व्रुत्ती समोर येत आहे. समाजातील काही लोक इतके कृर कसे वागू शकतात याचेच आश्चर्य वाटते.

मित्रा खुप छान शब्दात या परिस्थितीची मान्डणी केलीये.

खुप शुभेछा..💐
Unknown said…
अतिशय मार्मिक आणि अचूक टिपणी
Unknown said…
अभिजित जी खूप छान लेख, जी लोक असा इंजेकशन चा बाजार करत आहेत त्या लोकांना हा लेख वाचून लाज वाटेलच सगळीकडे धंदा नाही पाहायचा माणुसकी जिवंत ठेवली पाहिजे आम्हला ज्या परीने करता येतील ते प्रयत्न आम्ही ह्या महामारी मध्ये करत आहोत आपले काम ही खूप मोठे आहे आपली नेहमीच आम्हाला मदत होत असते आपल्या कार्याला आमचा सलाम
जय हिंद
जय महाराष्ट्र 🙏
Yamaji Malkar said…
अभिजीत जी आपला लेख आवडला।वर्तमानात याच विचारांची गरज आहे.
Unknown said…
आजच्या वास्तवावरील परिस्थितीचा गैरफायदा घेणाऱ्या वाईट प्रवृत्तीच्या डोळ्यात अंजण घालणारा लेख.....
Unknown said…
Vastav paristithi apan mandali ahe.. Ek evalishi chimani khup manavta shikavun jate.. Parantu jyanchya sanvedana bothat zalya ashi lok lutalut kartayet

Rakesh choure said…
Rakesh choure
अगदी बरोबर भाऊ खरी सध्याची हीच परिस्थिती आहे.खूप छान तुम्ही आपले विचार मांडले,मी तुमच्या विचारांशी सहमत आहे .खरच माणसांतली माणूसकी हरवून गेली आहे आणि त्याची जागा आज पैशानी घेतली आहे.अशा लोभी माणसांना कळत नाही ते काय पेरत आहे .आणि त्याच त्यांना पुढे आयुष्यात काय फळ मिळणार ???? जे पेरल तेच उगवणार.
Rakesh choure said…
Rakesh choure
अगदी बरोबर भाऊ खरी सध्याची हीच परिस्थिती आहे.खूप छान तुम्ही आपले विचार मांडले,मी तुमच्या विचारांशी सहमत आहे .खरच माणसांतली माणूसकी हरवून गेली आहे आणि त्याची जागा आज पैशानी घेतली आहे.अशा लोभी माणसांना कळत नाही ते काय पेरत आहे .आणि त्याच त्यांना पुढे आयुष्यात काय फळ मिळणार ???? जे पेरल तेच उगवणार.
आपण सत्यस्थिती मांडली सर..
सध्या जो तो त्याचा परीने रुग्णांची लूटमार करतोय. माणुसकी विसरलीत काही माणसं..

Popular posts from this blog

आसपासच्या मंथरा....